महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विम्याचा लाभ हवा असेल, तर कापूस पावसात भिजू द्या..! विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला - विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकरी पीक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनीधीकडे गेले असता, रामटेके नामक प्रतिनीधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा कृषी सहाय्यकाने अर्ज घ्या, अशी विनंती केल्यानंतर प्रतिनीधीने अर्ज स्वीकारले.

विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला

By

Published : Nov 3, 2019, 5:22 PM IST

चंद्रपूर- गोंडपिपरीमध्ये परतीच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पीक काढणीनंतर शेतमालाचे नुकसान झाले तरच विम्याचा लाभ मिळेल, असा अजब सल्ला विमा कंपनीच्या प्रतिनीधीने शेतकऱ्यांना दिला. तसेच विम्याचा लाभ हवा असेल तर कापूस पावसात भिजू द्या, असेही सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

हेही वाचा -चंद्रपुरात दुचाकीची समोरा-समोर धडक, एक मृत

गोंडपिपरी तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. शेकडो हेक्टरमधील धानपिक जमिनीवर लोळले. हातात येणाऱ्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार मदत करेल ही आस बळीराजाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही सुरु आहेत. मात्र, गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव, अळेगाव येथील शेतकरी पिक नुकसानीचा अर्ज देण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनीधीकडे गेले असता, रामटेके नामक प्रतिनीधीने अर्ज घेण्यास टाळाटाळ केली. तेव्हा कृषी सहाय्यकाने अर्ज घ्या, अशी विनंती केल्यानंतर प्रतिनीधीने अर्ज स्वीकारले.

हेही वाचा -धक्कादायक! पीठगिरणीत अडकल्याने धडापासून मुंडके झाले वेगळे; चंद्रपुरातील घटना

कृषी सहाय्यकांनी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून पीक नुकसानीचे अर्ज विमा प्रतिनीधीकडे देण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी दरवर्षी पीक विमा आम्ही भरतो. मात्र, नुकसान भरपाई कधीच मिळत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details