चंद्रपूर - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, असे असतानाही मूल तालुक्यातील नांदगाव येथे बाजार भरला. बाजारात नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली झाली. विशेष म्हणजे नांदगावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असतानाही हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी यावर कुठलेही पाऊल उचलले नाही.
मूल तालुक्यातील नांदगाव हे जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव आहे. याठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील अनेक खेडेगावातील नागरिक विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी येतात. नांदगाव येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले. तसे आदेश सर्व ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. असे असतानाही येथे बाजार भरला. यात भाजीपाला विक्रेते दाटीवाटीने बसले होते. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांनी सोशल डिस्टन्स न पाळता एकमेकांना खेटून बाजार केला. प्रशासनाच्या या बेपर्वाईने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास यास कोण जबाबदार राहील? असा सवाल सूज्ञ नागरिक करीत आहेत.
लॉकडाऊनची ऐशी की तैशी; नांदगावमधील बाजारामध्ये नागरिकांची तोबा गर्दी - chandrapur corona update
मूल तालुक्यातील नांदगाव हे जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्येचे गाव आहे. याठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. परिसरातील अनेक खेडेगावातील नागरिक विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी येतात.
लॉकडाऊनची ऐशी की तैशी; नांदगावमधील बाजारामध्ये नागरिकांची तोबा गर्दी
दरम्यान, बाजारात येणाऱ्या दुकानंदाराकडून ग्रामपंचायतीने चाळीस रुपये कराची वसूली केली मात्र त्यांना पावती देण्यात आली नाही.