महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये जुन्या खेळांना उजाळा; आजीबाई नातवंडांसोबत रमल्या 'बिटीफूल' खेळात - पारंपारिक खेळा

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणे शक्य नाही. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे, घराबाहेर पडणे अनेकांनी टाळले आहे. अशात कुटुंबासोबत गप्पागोष्टींमध्ये नागरिक रमले आहेत. वारंवार टीव्ही, मोबाईल पाहून वैतागलेले अनेक कुटुंब आता लुप्त झालेल्या पारंपारिक खेळाकडे वळत आहेत.

लॉकडाऊनमध्ये जुन्या खेळांना उजाळा
लॉकडाऊनमध्ये जुन्या खेळांना उजाळा

By

Published : Apr 26, 2020, 9:52 AM IST

चंद्रपूर- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे, घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. अशात विरंगुळा म्हणून टीव्ही, मोबाईल पाहून वैतागलेले कुटुंब आता करमणुकीसाठी लुप्त झालेल्या खेळांकडे वळले आहेत.

राजुरा तालुक्यातील रामपूर येथील आजीबाई आपल्या नातवंडासोबत बिटीफुल खेळात रमल्या आहेत. या निमित्ताने त्यांनी जून्या आठवणींना उजाळा दिला. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणे शक्य नाही. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे, घराबाहेर पडणे अनेकांनी टाळले आहे. अशात कुटुंबासोबत गप्पागोष्टींमध्ये नागरिक रमले आहेत.

वारंवार टीव्ही, मोबाईल पाहून वैतागलेले अनेक कुटुंब आता लुप्त झालेल्या पारंपरिक खेळाकडे वळत आहेत. चव्हाष्टा, सापशिडी, बिटीफुल या खेळांत कुटुंब रमताना दिसत आहेत. रामपूर येथील सत्तर वर्षीय वच्छला उरकुडे या आजीबाई आपल्या नातवंडांसोबत पत्त्यांच्या खेळात रमल्या. या निमित्ताने त्यांचाशी संवाद साधला असता त्यांनी जुaन्या आठवणींना उजाळा दिला. टीव्ही, मोबाईलमुळे आपसातील संवाद संपला आहे. त्यामुळे, नात्यात दूरावा निर्माण झाला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

ABOUT THE AUTHOR

...view details