महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक...! गावनेत्यांचा विनापरवानगी विलगीकरण इमारतीत प्रवेश

धाबा येथील गावनेत्यांनी विनापरवानगी इमारतीत प्रवेश केला. विलगीकरणात असलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. तसेच, ग्रामपंचायत तूमची योग्य सूविधा करत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही सूविधा पुरवू असेही सांगितले. या नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन विलगीकरणात असलेल्या लोकांनी ग्रामपंचायतेला धारेवर धरले.

विनापरवानगी विलगीकरण इमारतीत गावनेत्यांचा प्रवेश
विनापरवानगी विलगीकरण इमारतीत गावनेत्यांचा प्रवेश

By

Published : May 24, 2020, 3:12 PM IST

Updated : May 24, 2020, 3:21 PM IST

चंद्रपूर - पर प्रांतातून, जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना गावापासून लांब असलेल्या इमारतीत विलगीकरण करण्यात आले आहे. विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची भेट घेतांना स्थानिक प्रशासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना विनापरवानगी काही गावनेत्यांनी इमारत परिसरात प्रवेश करून विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींशी संवाद साधल्याची घटना जिल्ह्यातील धाबा येथे उघडकीस आली आहे. तसेच, तुम्हाला सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला लाखोंचा निधी आल्याचे सांगितले. या गावनेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. दरम्यान, ग्रामपंचायतीने येथे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून विनापरवानगी कुणालाही इमारत परिसरात प्रवेश न देण्याचा सूचना केल्या आहेत.

विलगीकरण इमारतीत गावनेत्यांनी केला विनापरवानगी प्रवेश

जिल्ह्यात एकाच दिवशी आढळून आलेल्या नऊपैकी तीन रुग्णांच्या संपर्कात असलेला व्यक्ती धाबा गावात आढळून आला. या प्रकाराने गाव हादरले असून भीतीचे वातावरण पसरले असताना गावनेत्यांचे घाणेरडे राजकारण समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पर प्रांतातून, जिल्ह्यातून धाबा गावात आलेल्या व्यक्तींचे गावाबाहेर असलेल्या खासगी इमारतीत विलगीकरण करण्यात आले आहे. विलगीकरण केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींना जेवणाचा डबा घेऊन जाण्याची परवानगी दिली असून बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशबंदी आहे.

असे असतांना धाबा येथील गावनेत्यांनी विनापरवानगी इमारतीत प्रवेश केला. विलगीकरणात असलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. तुम्हाला सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला लाखोंचा निधी आला असल्याचे सांगितले. तसेच, ग्रामपंचायत तूमची योग्य सूविधा करत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही सूविधा पुरवू असेही सांगितले. या नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन विलगीकरणात असलेल्या लोकांनी ग्रामपंचायतेला धारेवर धरले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. समाजमाध्यमांवर या प्रकाराची चर्चा झाल्यावर ग्रामपंचायत संतापली आहे.

दरम्यान, विलगीकरण करण्यात आलेल्या इमारतीच्या गेटजवळ दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रामपंचायतेने केली आहे. तसेच, कुटुंबातील व्यक्ती वगळता बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशबंदी केली आहे. महत्वाचे काम असल्यास बाहेरच्या व्यक्तींनी रितसर परवानगी घेतल्यावरच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सरपंच रोषणी अनमुलवार यांनी दिली.

Last Updated : May 24, 2020, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details