महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनातून दारूसाठा केला जप्त - chimur crime news

चिमूर वरोरा मार्गावर अवैध दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास सुरु असताना, एका अपघातग्रस्त वाहनातुन पोलिसांनी अवैध दारूसाठा जप्त केला असुन, याप्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. शेडेगाव जवळ असलेल्या आठवले समाजकार्य महाविद्यालयजवळ हा अपघात झाला.

liquor-found-in-vehicle-which-met-with-an-accident
चिमूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनातुन दारुसाठा केला जप्त

By

Published : Jul 2, 2020, 4:36 PM IST

चंद्रपूर- चिमूर वरोरा मार्गावर एका अपघातग्रस्त वाहनातून पोलिसांनी अवैध दारूसाठा जप्त केला असून, याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शेडेगावजवळ असलेल्या आठवले समाजकार्य महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला.

चिमूर वरोरा मार्गावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी वाहन जप्त केले.

'कर्ज काढायची वेळ आलीय.. त्यामुळे पगाराला कात्री लावण्याची गरज'

चिमूर वरोरा मार्गावर अवैध दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास सुरु असताना, चिमूर वरोरा मार्गावरील शेडेगाव जवळील आठवले समाजकार्य महाविद्यालयजवळ अपघात झाल्याची माहीती मिळाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावर पाहणी केली असता वाहनात 2 जण जखमी असल्याचे आढळले. तसेच वाहनाची तपासणी केली असता अवैध दारू साठा आढळला. दरम्यान, जखमींना उपचाराकरीता चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवुन पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किमंत 4,59,400 आहे. आरोपींवर कलम 279,337,338,269,271,188 भांदवीसह कलम 65अ, 83 मदाका , 51 ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा , कलम 3 साथीचा रोग प्रतिबंधक कायदा व 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख, विलास सोनूले,विलास निमगडे,किशोर बोढे,सतीश झिलपे, अवधूत खोब्रागडे,विजय उपरे यांनी केली.

वाहनातुन जप्त केलेला दारुसाठा

ABOUT THE AUTHOR

...view details