चंद्रपूर - बिबट्याने हल्ला करून गोठयातील 12 बकऱ्यांना ठार केल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात येणाऱ्या तळोधी नाईक या गावात घडली आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या खडसंगी बफर क्षेत्रात येते. त्यामुळे गावाच्या आजूबाजूला हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने गावात प्रवेश केला. यावेळी भाऊराव झिंगरू जांभळे यांच्या गोठ्यात असलेल्या तब्बल 12 बकऱ्यांचा फडशा पाडला. सकाळी भाऊराव उठले असता त्यांना ह्या सर्व बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्या. याची माहिती संबंधित ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी चौकशी करून पंचनामा केला, असता हे बिबट्याचे असल्याचे दिसून आले. बकरी मालकाचे यात मोठे नुकसान झाले असून त्याला नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या परिसरात ताडोबा व्यवस्थापनाने ट्रॅप कॅमेरे लावले असून, तेथे गस्तदेखील सुरू करण्यात आली आहे. या क्षेत्रातील गरीब गावकऱ्यांचे उदरनिर्वाह शेळीपालन कोंबडी पालनावर चालतो .अशावेळी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ला होत असल्याने गावकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
चंद्रपूरमध्ये बिबट्याची दहशत; हल्ल्यात केल्या 12 बकऱ्या ठार
चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या खडसंगी बफर क्षेत्रात येते. त्यामुळे गावाच्या आजूबाजूला हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने गावात प्रवेश केला. यावेळी भाऊराव झिंगरू जांभळे यांच्या गोठ्यात असलेल्या तब्बल 12 बकऱ्यांचा फडशा पाडला. सकाळी भाऊराव उठले असता त्यांना ह्या सर्व बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्या.
बिबट्याची दहशत