चंद्रपूर -तेलंगणा वनविभागाच्या आधारे भरारी पथकाने छापा टाकत बिबट्याचा चामडीसह नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. छाप्यात कोरपणा तालुक्यातून दोन तसेच तेलंगणातून सात असे एकूण नऊ आरोपी वनविभागाने ताब्यात घेतले आहेत. जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात वन्यजीवांची शिकार करून त्यांच्या अवयवांची अवैधरित्या विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती राजुरा वनविभागाला मिळाली होती.
हेही वाचा -'लोकांना बेकायदेशीर मार्गाने दारू प्यायची असल्याने मला नाकारले'
यानुसार, भरारी पथकाने कुसळ गावातील जगदीस लिंगु जुमनाके या व्यक्तीच्या घरी छापा टाकून बिबट्याची कातडी जप्त केली. संबंधित आरोपीची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने इतर साथीदारांची नावे सांगितली. या माहितीच्या आधारे तेलंगणातील पेवठामधून मुख्य आरोपी बारीकराव यशवंत आत्राम याला वनविभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी सापळा, बिबट्याची नखे तसेच दात सापडले आहेत.
दोन्ही आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे कोरपना तालुक्यातील चिंचोली तसेच तेलंगणातील बंबारा, चिचपल्ली या ठिकाणांहून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, पी.जी.कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली फनिंद्र गादेवार, एस.एन.बासमवार, गजानन इंगडे, ओंकार थेरे यांनी ही कारवाई केली.