महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard caged in Chandrapur : दहशत निर्माण करणारा दुर्गापुरातील बिबटया जेरबंद; नागरिकांना दिलासा - Leopard caged in Chandrapur

30 मार्चच्या रात्री आजोबाच्या मरणाला आलेल्या नातवाला बिबट्याने ( leopard attack in Chandrapur ) पळवले होते. तर आठ वर्षीय प्रतीक बावणेचा यात मृत्यू झाला होता. मुलाच्या आईचे वडील आज सकाळी मृत्यु पावले. तेजराम मेश्राम (महाराज) यांचा मृत्यू झाल्याने सर्व जण दुर्गापूर ( kid death in leopard attack ) येथे आले.

बिबट्या जेरबंद
बिबट्या जेरबंद

By

Published : Apr 9, 2022, 10:33 PM IST

चंद्रपूर- वेकोलीच्या दुर्गापूर परिसरात ( leopard terror in Durgapur ) दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. शनिवारी सकाळी या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात आले. मागील दोन महिन्यांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत होती.

30 मार्चच्या रात्री आजोबाच्या मरणाला आलेल्या नातवाला बिबट्याने ( leopard attack in Chandrapur ) पळवले होते. तर आठ वर्षीय प्रतीक बावणेचा यात मृत्यू झाला होता. मुलाच्या आईचे वडील आज सकाळी मृत्यु पावले. तेजराम मेश्राम (महाराज) यांचा मृत्यू झाल्याने सर्व जण दुर्गापूर ( kid death in leopard attack ) येथे आले. मेश्राम यांचे पार्थीव घरीच असल्याने सर्व जण घराच्या समोर बसून होते. तर प्रतीक (नातू) हा घराच्या मागे खेळत होता. तितक्यात अचानक बिबट्याने त्या बालकाला फरफटत जंगलात घेऊन गेले.

बिबट्या जेरबंद करताना वनविभाग

बिबट्याला जेरबंद करण्याचा दबाव-प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. मात्र, त्या बालकाचे बिबट्याने लचके तोडले. त्या बालकांचे वेगवेगळे अवयव मिळाल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वेकोली कार्यालयाची तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचा दबाव वनविभागावर वाढला होता. अखेर शनिवारी सकाळी या बिबट्याला पकडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details