महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सेवानिवृत्त डॉक्टर व नर्सेस यांची कंत्राटी पद्धतीवर तत्काळ नियुक्ती करा' - आमदार जोरगेवार यांच्या बद्दल बातमी

चंद्रपुरात कोरोना रुग्णांचा आकडा हजारांवर पोहोचला आहे. यामुळे सेवानिवृत्त डॉक्टर व नर्सेस यांची कंत्राटी पद्धतीवर तत्काळ नियुक्ती करा, अशा सूचना आमदार जोरगेवार यांची जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चंद्रपूर
चंद्रपूर

By

Published : Apr 14, 2021, 9:29 PM IST

चंद्रपूर -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाशी लढण्याकरिता आरोग्य व्यवस्था बळकट करणे गरजेचे असून अनेक सेवानिवृत्त डॉक्टर व नर्सेस या कठीण काळात सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. अशात सदर डॉक्टर व नर्सेसला तत्काळ कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करण्यात यावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिल्या आहे.

चंद्रपुरात कोरोना रुग्णांचा आकडा हजारांवर पोहोचला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असून रुग्णांची गैरसोय होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करुन आपसात योग्य समन्वय ठेवण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. खासगी व शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हायफ्लो ऑक्सिजन बेडसंख्या वाढविण्यात यावी, खासगी रुग्णालयातील बेडची कमतरता बघता रुग्ण संख्येच्या तुलनेत त्यांच्या रुग्णालयाची क्षमता १० टक्कांनी वाढविण्यात यावी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी दिशादर्शक तसेच रुग्णाची प्रकृती व आजारावरील उपचाराकरिता योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी माहिती व मदत केंद्राची स्थापना करण्यात यावी, सेवानिवृत्त डॉक्टर्स व सेवानिवृत्त नर्सेसला अग्रिम मानधन देवून कंत्राटी पद्धतीने तत्काळ नियुक्ती करण्यात यावी, चंद्रपूर जिल्हातील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर लक्षात घेता रुग्ण संख्येच्या तुलनेत बेड उपलब्ध करण्याकरिता आयएमएच्या तज्ज्ञ सदस्यांबरोबर चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्यात यावे, आरटीपीसीआर तपासणी संदर्भातील संदेश वेळेवर पोहोचत नाही, त्याकरिता तांत्रिक अडचण दूर करून सदर संदेश सुलभ भाषेत तत्काळ रुग्णांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करावी, कोविड रुग्णालयांकरिता स्वयंस्फूर्तीने येणाऱ्या खासगी रुग्णालयांना नियमानुसार अटी व शर्तीसह कोविड रुग्णालय सुरू करण्याकरिता तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details