महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसीची छेड काढली म्हणून लहान भावाची केली हत्या; 'क्राईम सिरीयल' बघून काढला काटा - chandrapur police

प्रेयसीची छेड काढल्याचा राग मनात ठेवून भावानेच आपल्या लहान भावाचा खून करून मृतदेह घरामागे पुरल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर येथे मंगळवारी उघडकीस आली.

murder
प्रेयसीची छेड काढली म्हणून लहान भावाची केली हत्या

By

Published : Jul 15, 2020, 12:50 AM IST

चंद्रपूर - प्रेयसीची छेड काढल्याचा राग मनात ठेवून भावानेच आपल्या लहान भावाचा खून करून मृतदेह घरामागे पुरल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर येथे मंगळवारी उघडकीस आली. आरोपीला अटक करण्यात आले आहे. दूरचित्रवाहिणीवरील क्राईम सिरीअल बघून भावाचा काटा काढला, अशी कबुली त्याने दिली.

दुर्गापूर येथील अनिकेत विपुल रामटेके (वय १७) आणि अंकीत विपुल रामटेके (वय २१) हे सख्ये भाऊ आहेत. अंकीतनेच विपुलचा खून केला. या दोघा भावडांच्या घरा शेजारी राहणारा देवानंद जयंतराव थोरात रात्री दहा वाजेच्या सुमाराला दुर्गापूर पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसही क्षणभर थक्क झाले. आकाश रामटेके नामक व्यक्तीच्या घरामागील परसबागेत कवेलु ठेवून आहे. त्या ठिकाणी माणसाचा हाताच्या हाडासारखे दिसत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनाही येथे मानवी मृतदेह पुरल्याची खात्री पटली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने कारवाई शक्य झाली नाही. तो परिसर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून सील केला. मात्र, पोलिसांचा तपास रात्रीही सुरूच होता. त्यांना वॉर्ड क्रमांक एकमधील विपुल रामटेके मागील दहा -बारा दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याचा मोठा भाऊ अंकीत देखील वसतीत दिसत नसल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या दोघांच्या आईला विचारणा केली. तेव्हा अनिकेत बाहेर गावी कामासाठी गेला असे अंकीतने सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हाच पोलिसांचा संशय बळावला.

अंकीतचा मोबाईल सुद्धा बंद होता. रात्री पोलिसांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो हाती लागला नाही. शेवटी खबऱ्याच्या माहितीवरून इरई नदीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका जंगलातील गुराच्या गोठ्यामध्ये तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतले. परंतु सुरुवातील त्याने पोलिसांनाच चक्रावून टाकले. शेवटी त्याने धक्कादायक घटनाक्रम सांगितला.

अंकीतचे एका मुलीवर प्रेम होते. घटनेच्या सहा दिवसांपूर्वी अनिकेतने तीची छेड काढली. त्यामुळे अंकीत चिडला होता. अनिकेतला कायमचे संपवण्याचा निर्णय त्याने केला. अंकीतने अनिकेतला आपल्या जाळ्यात ओढले. आपण दारूचा विक्रीचा व्यवसाय करू. दारू लपवण्यासाठी घरामागील परसबागेत खड्डा तयार करू. दोघांनी मिळून खड्डा तयार केला. ठरलेल्या योजनेप्रमाणे अनिकेतला सत्यवान रामटेके यांच्या घरी बोलवले. दारू पाजली अणि गळफास लावून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आधीच खनून ठेवलेल्या खड्ड्यात त्याला पुरले. त्याचा वास येऊ नये यासाठी फिनाईल, डांबर गोळ्या आणि प्रेत लवकर कुजावे यासाठी युरिया आदी साहित्य टाकले. आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून, मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details