चंद्रपूर -'दृश्यम' चित्रपटाच्या ( Drishyam movie) कथानकाने सर्वांनाच भुरळ पाडली. एका खुनाला लपविण्यासाठी अजय देवगण जी खोटी कथा रचतो ती थक्क करणारी आहे. मात्र अस्सल जीवनात अशीच एक कथा एका दहा वर्षांच्या मुलाने रचली आहे. त्याची ती कथा ऐकुन पोलीसही बुचकाळ्यात पडले. काही लोकांनी आपले अपहरण केले असा बनाव त्याने केला मात्र, अखेर पोलिसांनी हे बिंग उघडे पाडले. हे नाट्य त्याने का रचले याचे कारण ऐकून आपणही थक्क व्हाल. या मुलाने शाळेत दांडी मारली आणि बाहेर हुंदडत होता. घरी यायला उशीर झाला, आता कारण काय द्यायचे हा प्रश्न त्याच्यासमोर असताना त्याने हे नाट्य रचले.
Chandrapur Crime: दहा वर्षाच्या मुलाने रचला अपहरणाचा बनाव; कारण ऐकून चंद्रपूर पोलिसही चक्रावले!
'दृश्यम' चित्रपटाने ( Drishyam movie ) सर्वांनाच भुरळ पाडली आहे. एका खुनाला लपविण्यासाठी अजय देवगण जी खोटी कथा रचतो ती थक्क करणारी आहे. मात्र अस्सल जीवनात अशीच एक कथा एका दहा वर्षांच्या बालकाने रचली आहे. शाळेला बुट्टी मारल्याने पालक रागावू नये म्हणून दहा वर्षांच्या मुलाने अपहरणाची ( Abducted by a ten year old boy ) कहाणी तयार केल्याची घटना चंद्रपूरलगत ( Chandrapur padoli ) असलेल्या पडोली येथे घडली आहे.
क्राईम शो पाहून मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा केली तयार - हा प्रकार आहे चंद्रपूरलगत असलेल्या पडोली येथे घडला आहे . शाळेला बुट्टी मारल्याने पालक रागावू नये म्हणून एका मुलाने अपहरणाची कहाणी तयार केली. टीव्हीवरचे क्राईम शो ( Crime show ) पाहून या मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा तयार केल्याचे तपासात उघड झाले. मुलगा घरी पोचल्यावर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहूचालकाने अपहरण केले. आपण त्याच्या तावडीतून कसाबसा सुटलो अशी कहाणी प्रकरण पोलीस ठाण्यात पोचल्यावरही वारंवार सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर देखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली. या मुलाने क्राईम सीरिअल आणि चित्रपट ( Crime Serials and Movies ) बघितले होते त्याचा वापर या मुलाने केला होता.