महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात 'काजळी' रोगाने धानपिक पडले काळे - धानपीक काजळी रोगाने काळवंटले बातमी

गोंडपिपरी तालुक्यात या पावसाळ्यात दमदार पाऊस झाला. पावसाने उसंत न घेतल्याने बळीराजावर दुसऱ्यांदा पेरणीचे संकट कोसळले. मात्र, मोठ्या मेहनतीने बळीराजाने शेती उभी केली. मात्र, आता निसर्ग पुन्हा कोपला.

'काजळी' रोगाने धानपिक काळवंटले

By

Published : Nov 18, 2019, 1:22 PM IST

चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात धानपिकावर बुरशीजन्य काजळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीनाशक औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात आलेला नाही. हातात येणारे धानपीक काजळी रोगाने काळे झाल्याने बळीराजाला मोठा फटका सोसावा लागत आहे.

'काजळी' रोगाने धानपिक पडले काळे

हेही वाचा-...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

गोंडपिपरी तालुक्यात या पावसाळ्यात दमदार पाऊस झाला. पावसाने उसंत न घेतल्याने बळीराजावर दुसऱ्यांदा पेरणीचे संकट कोसळले. मोठ्या मेहनतीने बळीराजाने शेती उभी केली. मात्र, निसर्ग पुन्हा कोपला. अवकाळी पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून बळीराजा अद्यापही सावरलेला नाही. आता शेतपिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

चेकनांदगाव शेतशिवारातील धानपिकावर बुरशीजन्य काजळी रोगाने आक्रमण केले आहे. बुरशीनाशक औषधांची फवारणी करूनही रोग आटोक्यात आलेला नाही. काजळीने अर्ध्यापेक्षा अधिक धानपिक काळे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details