महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईदच्या पर्वावर कबड्डी खेळाडूंनी केले रक्तदान शिबिराचे आयोजन - गोंडपिपरी रक्तदान शिबीर बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनकाळी आपणही समाजासाठी काहीतरी करावे, असे गोंडपिंपरीच्या काही मुलांनी ठरविले. त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ईदचा पावन पर्व निवडण्यात आला. सध्या चंद्रपूरचे तापमान 46 अंश सेल्सियसच्या वर गेलेले आहे. अशावेळी कुणी रक्तदान करणार का, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र, या शिबिराला सहा महिलांसह तब्बल 83 लोकांनी रक्तदान करत दायित्व जोपासले.

कबड्डी खेळणाऱ्या पोरांनी लॉकडाऊनमध्ये केलं हे सामाजिक काम
कबड्डी खेळणाऱ्या पोरांनी लॉकडाऊनमध्ये केलं हे सामाजिक काम

By

Published : May 28, 2020, 12:14 PM IST

चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या संकटकाळात आपणही समाजासाठी काहीतरी करायला हवे हा विचार गोंडपिपरी तालुक्यातील काही कबड्डी खेळणाऱ्या तरुणांच्या मनात आला. मग काय या कबड्डीप्रेमी पोरांनी ईदच्या पर्वावर रक्तदान शिबीराचे आयोजन केले. यामध्ये 46 डिग्री सेल्सियस तापमानात सहा महिलांसह एकूण 83 लोकांनी रक्तदान करत दायित्वाचा परिचय दिला. कबड्डी खेडणाऱ्या, कट्ट्यावर चर्चा रंगविणाऱ्या पोरांच्या सामाजिक कामाची परिसरात चर्चा होत आहे.

कोरोनाने एकीकडे संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. तर, कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपली आरोग्य यंत्रणा, पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस एक करताहेत. समाजातील काही सहृदयी या कठीण काळात मदतीचा हात देत आहेत. कुणी प्रशासनाला आर्थिक मदत करत आहेत. तर, कुणी गरीब, गरजूंकरता जेवणाची सोय करत आहेत. यातच गोंडपिपरीतील कबड्डी खेळणाऱ्या तरुणांनी रक्तदान शिबिराचे केलेले आयोजन हे सामाजिक कार्य सध्या कौतूकास पात्र ठरले आहे.

गोंडपिपरीतील या तरुणांपैकी कुणी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले, काही स्पर्धा परिक्षेची तयारी करणारी मुलं आहेत. तर, काही रोजीरोटी करून आपल्या कुटुंबीयांना मदत करणारे मुलं आहेत. ते रोज कबड्डी खेळायचे आणि यातूनच त्यांनी मंडळाची स्थापना करत कबड्डी स्पर्धा यशस्वी केली. अशातच कोरोनाचे सावट आले आणि त्यांच्यापूढे घरी बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. या संकटकाळात आपणही मदतीचा हात द्यावा असे ठरवत त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ईदचा पावन पर्व निवडण्यात आला. सध्या चंद्रपुरात उष्णतेचा भडका उडाला आहे. तापमान 46 अंश सेल्सियसच्या वर गेलेले आहे. अशावेळी कुणी रक्तदान करणार का, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र, या शिबिराला सहा महिलांसह तब्बल 83 लोकांनी रक्तदान करत दायित्व जोपासले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारपुढे मोठे संकट आहे, अशातच रक्ताची मोठी गरज भासणार आहे. यात कबड्डी खेळणाऱ्या,कट्ट्यावर चर्चा रंगाविणाऱ्या या तरुणांनी राबविलेल्या या उपक्रमाची दखल घेत गावकरी त्यांचे कौतूक करत आहेत. चेतन यशवंतवार, रोहित पुण्यप्रेड्डीवार, प्रवित ताडशेट्टीवार, प्रज्वल घोडाम, नागेश धूडसे, रितेश पौनीकर, गौरव झाडे, बालू बच्चूवार व त्यांच्या मित्रमंडळींच्या पुढाकारातून एक सामाजिक कार्य संपन्न झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details