महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 22, 2019, 4:52 PM IST

ETV Bharat / state

चंद्रपूरमधील इरई धरण भरले; दोन दरवाजातून विसर्ग सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील महाऔष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारे इरई धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.

चंद्रपूरमधील इरई धरण भरले

चंद्रपूर - जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलाशयांतील पाणासाठा वाढला आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करणारे इरई धरण तुडूंब भरले आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.

चंद्रपूरमधील इरई धरण भरले
सध्या इरई धरणाची पाणी पातळी 207 मीटरपर्यंत पोचली. धरण 97.73 टक्के भरल्यामुळे दुपारी बारा वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडू शकतो. ऐनवेळी पाण्याचा विसर्ग केल्यास कृत्रिम पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आज दोन दरवाजे उघडण्यात आले, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details