चंद्रपूर -महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. ज्यात महाराष्ट्रातील ध्वनी प्रदूषणात (Increase noise pollution) चिंताजनकरित्या वाढ झाल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही वाढ झाल्याचे समोर आले आहे. शहरातील गांधी चौक, जटपुरा गेट आणि वरोरा नाका या वर्दळीच्या ठिकाणी तर हे ध्वनी प्रदूषण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २१ आणि २२ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील २७ महापालिका शहरात १०२ ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची सतत २४ तास निरीक्षणे घेतली. यात दिवसा आणि रात्रीचा तसेच कार्यालयीन आणि सुट्टीच्या दिवसांचा समावेश होता. या अहवालानुसार राज्यातील सर्वच औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्रातील सर्वच प्रभागात ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. राज्यातील सर्वच शहरात दिवसा आणि रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात धोकादायकरित्या वाढ झाली आहे. ध्वनी प्रदूषण हे अदृश्य असले तरी ते जीवघेणे आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाय योजना करणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना अनेक दुखदायक आजाराना सामोरे जाण्याची भीती आहे. गेल्या १० वर्षांपासून मंडळ ध्वनी प्रदुषणाच्या नोंदी घेत आहेत. ध्वनी प्रदूषणाची ही निरीक्षणे प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे महाबळ एन्विरो इंजिनिअर्स प्रा.ली तर्फे २१-२२ फेब्रुवारी २०२१ ला सुद्धा २७ शहरातील १०२ ठिकाणी घेण्यात आली. त्यात खालील शहरात कार्यालयीन आणि सुट्टीच्या दिवशी तसेच दिवसा आणि रात्री ध्वनी प्रदूषणाच्या तीव्रतेच्या नोंदी घेण्यात आल्या. यात बहुतेक शहरात दिवसा आणि रात्री ध्वनी प्रदूषण सुरक्षित मानकापेक्षा अधिक आढळले.
'या' शहरात सर्वाधिक नोंदी