चंद्रपूर - राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय वडाळा (पैकु) चिमूर येथील विद्यार्थ्यांचे आकलनाच्या दृष्टीने त्यांच्या हावभावाच्या भाषेचा विकास करण्यासाठी 'अलियावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप मूंबई' या संस्थेच्या मदतीने स्मार्ट डिजीटल वर्ग (खोली) करण्यात आला आहे. बालिका दिनाचे औचित्य साधून स्मार्ट वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - एकेकाळी चाळीमध्ये राहणारा माणूस करणार चाळीचा विकास!
कर्णबधीर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास करणारी पातळीवर काम करणाऱ्या 'अलियावर जंग नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर द हेअरिंग हॅन्डीकॅप मूंबई' या संस्थेने कार्यक्रम विकसीत केले आहे. या संस्थेद्वारे कर्णबधीर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम (पुर्वप्राथमिक) तयार करणे, शिकण्यासाठी चिन्हांचा अभ्यासक्रम विकसीत करून तयार करणे, भाषण आणी भाषा विकास करण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. मुकबधीर विद्यालयामध्ये विविध प्रकारचे साहीत्य पुरविणे इत्यादी काम करण्यात येतात. त्यामूळे राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयानी या संस्थेशी संपर्क करून वर्ग खोली स्मार्ट केली आहे.