चंद्रपूर - 26 जानेवारी, 1950 रोजी सर्व धर्मांच्या ग्रथांहून पवित्र अशी घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. याच राज्य घटनेमुळे हा देश शिल्लक आहे. तुम्ही आम्ही शिल्लक आहोत. हे राज्य घटने प्रमाणे चालले पाहीजे. घटनाबाह्य कृती कोणी कितीही मोठा असेल आम्ही सहन करणार नाही, असे खार जमिनी विकासमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे पंचायत समिती व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलानाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शिक्षणाबरोबर संस्कार आणि संगतीही महत्वाची असते. शिक्षण, संस्कार आणि संगती या तीन गोष्टीची परिपुर्णता असेल, तर तो विद्यार्थी परिपूर्ण होते. संगत चांगली व निर्वसनी असली तर विद्यार्थ्याचे भविष्य उज्जल होते. विद्यार्थ्यांनी आपापसात संवाद साधत राहणे गरजेचे आहे. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - 'ज्यांच्या घड्याळाचे बारा वाजले त्यांच्याबद्दल काय बोलयचे'