चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडांगणाचे काम तब्बल तीन वर्षानंतर अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मैदानी परिसरात पोलीस, आणि सैन्यात भरतीची तयारी करणारे विद्यार्थी तसेच सराव करणाऱ्या खेळाडूंच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र प्रशासकीय हलगर्जीपणा आणि राजकीय पेचामुळे या क्रीडांगणाचे लोकार्पण रखडले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला सुधीर मुनगंटीवारांच्या Guardian Minister Sudhir Mungantiwar वनमंत्री मिळाले. मात्र त्यांची नियुक्ती अद्याप चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून झालेले नाही. जोवर पालकमंत्री नियुक्त होत नाही, त्यापूर्वी याचे लोकार्पण होणे अवघड आहे. त्यामुळे या क्रीडांगणात सराव करण्यासाठी त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा विषयक विविध सुविधा तयार करण्याच्या कामाला 2019 मध्ये मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नाशिक येथील पीएच इन्फ्रा या कंपनीला हे काम देण्यात आले. यातून 400 मीटरची आधुनिक सिन्थेटिक धावपट्टी, एक फुटबॉल मैदान तसेच खेळाडूंसाठी शौचालय आणि स्नानगृहे बांधण्याचे काम दिले होते. 13 कोटींच्या निधीतून होणारे हे काम दहा महिन्यांत पूर्ण होणार होते. तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात याला सुरुवात झाली. मात्र, यानंतर राज्यात सत्तापालट झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार Maha Vikas Aghadi Govt आले. यानंतर हे काम रखडले. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोनाची लाट आली आणि हे काम पूर्णतः बारगळले. यानंतर संथगतीने हे काम सुरू होते. तब्बल तीन वर्षांनंतर हे काम पूर्ण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिन्याआधीच काम पूर्ण झाले असून ते जिल्हा क्रीडा संकुलाकाकडे हस्तांतरित करण्याचे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या विभागाला पाठवले होते. मात्र तब्बल एक महिना पुंड यांच्या कार्यालयाकडून याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
जोखीम घेऊन खुल्या रस्त्यावर धावतात मुलंमागील तीन वर्षांपासून जिल्हा क्रीडा संकुलाचे मैदान आणि धावपट्टी कामाच्या नावाने बंद आहे. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी दुसरे मोठे मैदान नसल्याने आणि तिथे सराव करण्याची परवानगी मिळत नसल्याने या मुलांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर धावावे लागत आहे. सैन्य आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक मुलं सकाळी सायंकाळी रहदारीच्या रस्त्यावर धावताना दिसतील. यात अपघात होण्याची मोठी जोखीम असते. त्यामुळे पाय आणि गुडघ्यावर गंभीर दुखापत होते. ही स्थिती म्हणजे शासन आणि प्रशासनाचे अपयश आहे.