चिमूर (चंद्रपूर) -सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे यांच्या कल्पनेतून पोलीस अधिकारी आणी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चंद्रपूरमध्ये पोलीस ठाणे परीसरात खुल्या व्यायाम शाळेची निर्मिती करण्यात आली आहे. ही व्यायामशाळा कोरोना योद्धांना समर्पित करण्यात आली आहे.
खुल्या व्यायाम शाळेचा अभाव :
चिमूर येथे पोलीस गृहनिर्माण विभागातर्फे भव्य पोलीस भवन कार्यालयाची वास्तू तथा सर्व सोयींनी युक्त पोलीस वसाहत बनविण्यात आली आहे. या पोलीस भवन परिसरात व्यायाम शाळेसाठी इमारत होती. मात्र, व्यायामासाठी पुरेसे यंत्र व साहित्य नसल्याने इमारत बंद होती. तसेच चिमूर शहरात सर्वसामान्य नागरिकांना सोयीची अशी खुली व्यायाम शाळा नसल्याने अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूला व्यायाम करत होते. शहरातील ही परिस्थिती सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा विभागीय पोलिस अधिकारी नितिन बगाटे यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या दृष्टीने खुल्या व्यायामशाळेच्या निर्मितीचा चंग बांधला.
खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन हेही वाचा -'माझं मंगळसूत्र गहाण ठेवा पण विज कापू नका', मोझरीतील महिलेची महावितरणच्या अधिकाऱ्यांना विणवणी
अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा खारीचा वाटा
खुल्या व्यायाम शाळेच्या निर्मितीकरिता चिमूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणी कर्मचाऱ्यानींही यात खारीचा वाटा उचलला.
उद्घाटनास उपस्थिती
ही खुली व्यायाम शाळा कोरोना योद्धे तसेच सामान्य नागरिकांना समर्पित करण्यात आली. होळीच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक अलिम शेख, राजू गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी व परिवार, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस विभागाच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
हेही वाचा -आता अपघातग्रस्तांना मिळणार तातडीने मदत, राज्यात मृत्युंजय दुतांची नियुक्ती
अनारोग्य व दुर्गुणांची केली होळी
समाजातील असलेल्या अनारोग्य, वाईट प्रवृत्ती , दुर्गुणांची होळी करण्याचा संदेश पोलीस भवन परीसरातील वसाहसतीत अप्पर पोलीस अधीक्षक तथा अधिकाऱ्यांनी पेटविलेल्या होळीतून देण्यात आला .