चंद्रपूर - जिल्ह्यात काल 24 तासांत 1 हजार 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1 हजार 125 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली असून 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 61 हजार 437 वर पोहोचली आहे. तसेच, सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 44 हजार 88 झाली आहे. सध्या 16 हजार 420 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 53 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 14 हजार 491 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
काल मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथील 83 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45 वर्षीय महिला, नगीना बाग परिसरातील 49 वर्षीय पुरुष, 56 व 65 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 58 वर्षीय पुरुष, सुमित्रा नगर परिसरातील 45 वर्षीय महिला, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 54 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 26 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा येथील 60 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील 53, 65 व 70 वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील 46 वर्षीय पुरुष, भिसी येथील 64 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कन्हाळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 29 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 44 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 33 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.