चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 1741 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408 झाली आहे. सध्या 16 हजार 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
गुरुवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53,60 व 68 वर्षीय पुरुष,
लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45,55 व 67 वर्षीय महिला, रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
तसेच वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष,
बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला,विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष,
कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 50 व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 65 वर्षीय महिला, आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.