महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रूग्णवाहिकेतून दारूची तस्करी; रामनगर पोलिसांच्या छाप्यात 65 पेट्या जप्त

अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 65 पेट्यांचा दारूसाठा जप्त केला आहे. संबंधित जप्त केलेली रूग्णवाहिका बीव्हीजी ग्रुपची असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

By

Published : Aug 18, 2019, 9:30 PM IST

चंद्रपूर - अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 65 पेट्यांचा दारूसाठा जप्त केला आहे. चालक राहुल वानखेडे याला अटक झाली असून, त्याच्या सोबतचे दोन आरोपी फरार आहेत. संबंधित जप्त केलेली रूग्णवाहिका बीव्हीजी ग्रुपची असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

रूग्णवाहिकेतून दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. रात्री 3 च्या दरम्यान एमएच 14 सीएल 0891 ही रुग्णवाहिका रामनगर पोलीस ठाणे चौकात आल्यावर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. यानंतर या रुग्णवाहिकेचा पाठलाग करून बाबुपेठ परिसरात ही गाडी पकडण्यात आली. रूग्णवाहिकेतील तिघांपैकी दोघे पळ काढण्यात यशस्वी झाले असून, चालक राहुल वानखेडे पोलिसांच्या हाती लागला आहे. ही दारू यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूरात आणली जात होती.

अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून वेगवेगळ्या मार्गांनी दारू तस्करी केली जाते. सिलेंडरमधून, भाजीपाल्याच्या टोपलीतून तसेच गाडीत विशेष कप्पे करून, अन्नधान्याच्या पोत्यांतून ही तस्करी केली जात असल्याचे अनेक पोलीस कारवायांमधून समोर आले आहे.

या रुग्णवाहिकेचा वापर जवळच्या शासकीय रुग्णालयासाठी केला जातो. याचाच गैरफायदा यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णवाहिका कर्मचारी घेत होते. आरोपी राहुल वानखेडे परस्पर दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details