महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात अवैध दारूसह सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त - उमा नदी

चिमूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत, अवैध दारूसह सुमारे 9 लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उमा नदी पात्राजवळ ही कारवाई करण्यात आली.

Illegal liquor seized in Chandrapur
चंद्रपूरमध्ये अवैध मद्यसाठा जप्त

By

Published : Dec 23, 2019, 2:33 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केल्यानंतरही दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. शनिवार 21 डिसेंबरला मध्यरात्री चिमूर पोलिसांनी उमा नदी पात्राजळ केलेल्या कारवाईत अवैध दारूसह 9 लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा... अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...

उमा नदी काठावर अवैध दारू आणण्यात येणार असल्याची माहिती चिमूर पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार नदीकाठी सापळा रचला. त्यावेळी पोलीसांना नदीपात्रात एका स्कॉर्पीओ गाडीतुन दारूच्या पेट्या उतरवताना दिसून आले. मात्र थोड्या वेळात पोलिसांना पाहता दारूविक्रेते पसार झाले. मात्र पोलिसांनी अवैध दारूसह सुमारे 9 लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा... 'तरुणांनो, मोदी-शाह यांनी तुमचे भविष्य उद्धवस्त केले.. भारताची विभागणी करुन द्वेषामागे लपण्याचा प्रयत्न'

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 20 बॉक्समध्ये सुमारे 2 लाखांची दारू, तसेच एक स्कार्पिओ (गाडी क्रमांक MH 33 A 3499) असा एकूण 9 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details