चिमूर (चंद्रपूर) - भाजीपाला वाहतुकीच्या नावावर अवैध दारूसाठ्याची वाहतूक बोलेरो पीक अप वाहनातून होत असल्याची भीसी पोलीस स्टेशनला गोपणीय माहीती प्राप्त झाली. त्याप्रमाणे टाका फाटा येथे नाकाबंदी लावून संशयित वाहनाची तपासणी केली असता कांदे, लसून व बटाट्याच्या ५० पोत्याआड चार खोक्यात ५० हजार १०० रूपयाची विदेशी दारू आढळली. वाहनासह सुमारे ५ लाख ५० हजार १०० रुपयाच्या मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.
चिमूरमध्ये भाजीपाल्याच्या वाहनातून विदेशी अवैध दारूसाठा जप्त
पोलिसांनी टेका नाका येथे नाकाबंदी लावून संशयीत वाहन महिंद्रा बोलेरो पिक अप (क्रमांक एम. एच. ३४ बी जी ३३०९) याला थांबवून तपासणी केली. यावेळी कांदे, लसूण,आलू यांचे ५० कट्ट्याखाली ४ बॉक्स मध्ये लपवून ठेवलेली रॉयल स्टँगचे १८० मीली २३ नग ६९०० रूपये,ऑफिसर चॉइस ब्लू -१८० मीली १४४ नग ४३ हजार २०० रुपये किमतीची अशी एकूण ५० हजार १०० रूपयाचा विदेशी दारूसाठा आढळला.
चिमूर तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा येतो.भाजीपाल्याची ने आण करणाऱ्या चिमूर येथील महेंद्रा बोलेरो पिक अप या वाहनात उमरेडवरून दारूसाठा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती भीसी पोलीसांना मिळाली. पोलिसांनी टेका नाका येथे त्वरीत नाकाबंदी लावून संशयीत वाहन महिंद्रा बोलेरो पिक अप (क्रमांक एम. एच. ३४ बी जी ३३०९) याला थांबवून तपासणी केली. यावेळी कांदे, लसूण,आलू यांचे ५० कट्ट्याखाली ४ बॉक्स मध्ये लपवून ठेवलेली रॉयल स्टँगचे १८० मीली २३ नग ६९०० रूपये,ऑफीसर चॉइस ब्लू -१८० मीली १४४ नग ४३ हजार २०० रुपये किंमतीची अशी एकूण ५० हजार १०० रूपयाचा विदेशी दारूसाठा आढळला.
चालक आरोपी सुरज अशोक वनमाळी (वय -२४ वर्षे, रा.-चिमूर ) याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याचे विरोधात भीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ही कारवाई भीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे नेतत्वात पोलीस पथकांनी पार पाडली .