चंद्रपूर -राजुरा विधानसभा मतदारसंघ नेहमीच काँग्रेस पक्षासाठी अनुकूल राहिला आहे. पक्षाचा विचार तळागळातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. म्हणूनच येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आहे.
याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसला जिल्ह्यातून सर्वाधिक आघाडी राजुरा विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती. हेच चित्र या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली.