चंद्रपूर- चिमूर शहरात मध्यरात्री १.३० च्या सुमारास तूफान चक्रिवादळासह जोरदार पाऊस आला. यामुळे नगर परिषद क्षेत्रातील अनेक घरांचे छप्पर उडाले, तर काही घरांची पडझड झाली आहे. झाडे सुद्धा कोलमडून पडलीत, त्यामुळे विजेच्या तारा सुद्धा तुटल्या. यामुळे नागरिकांना आंधारात रात्र काढावी लागली.
अचानक आलेल्या चक्रीवादळ व पावसाने नागरिकांना धडकी भरवली. चक्रिवादळामुळे नेताजी वॉर्ड येथील छबी लालजी कामडी यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडाले. या घटनेत कामडी यांची मुलगी वर्षा हिच्या डोक्याला किरकोळ मार लागला. तसेच, राजू कवडू बनकर यांचा बैलाचा गोठा, अमित सुभाष अगडे यांच्या घराचे छत, गुरुदेव वॉर्डातील नारायण पचारे यांचे सीलिंग पंख्यासह छप्पर उडाले. बामणी येथील प्रभाग क्रमांक १७ मधील हरीचंद्र जांगडे यांच्या घरावर झाड पडल्याने त्यांच्या घराचेही नुकसान झाले.