महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेची तार पसरून चितळासह रानडुकराची शिकार; गोंडपिंपरीमधील घटना - chandrapur forest department

गोंडपिपरी तालूक्यातील वेडगाव शिवारात विद्यूत प्रवाह चालू असेलेली तार पसरवून चितळ, रानडुकराची शिकार केल्याची घटना घडली आहे. शिकार करणारे दुसऱ्या राज्यातील असल्याची वनविभागाची शंका आहे.

chandrapur pig hunt
विजेची तार पसरून चितळासह रानडुकराची शिकार; गोंडपिंपरीमधील घटना

By

Published : Mar 19, 2020, 5:53 AM IST

चंद्रपूर -विद्यूत प्रवाह चालू असेलेली तार पसरवून चितळ, रानडुकराची शिकार केल्याची घटना गोंडपिपरी तालूक्यातील वेडगाव शिवारात उघडकिस आली. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी फरार असून वनविभाग आरोपींचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे वेडगावपासून जवळच असलेल्या पोडसा शेतशिवारात विषयूक्त रानडुकराचे मास खाल्याने वाघीनीचा मृत्यू झाला होता. या भागाला तेलंगणाची सिमा लागून आहे. त्यामुळे या भागात आंतरराज्यीय शिकार टोळी सक्रिय असल्याची शंका वनविभागाला आहे.

विजेची तार पसरून चितळासह रानडुकराची शिकार; गोंडपिंपरीमधील घटना

हेही वाचा -अवकाळी पावसामुळे जळगावातील हजारो हेक्टर क्षेत्राला तडाखा; गहू, हरभरा, केळी पिकाचे मोठे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गोंडपिपरी तालूक्यातील वेडगाव परिसरातील विद्यूत पुरवठा आज पहाटेला खंडित झाला होता. महावितरणचे धाबा येथील शाखा अभियंता टि. पी. लेकूरवाडे यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे मुकेश आदे, संदिप पुलगमकर, राजेंद्र आवळे, वनपाल पेंदोर या कर्मचाऱ्यांनी गस्त केली. दरम्यान, सकमुर-वेडगाव मार्गावरील नागापूरे यांच्या शेतात मृत चितळ आढळून आले. तर जवळ मृत रानडुकर होते. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहीती वनविभागाला दिली. वनपाल जयपूरकर ,वनरक्षक धनपाल रायपूरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, शिकार करणारे फरार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details