चंद्रपूर - विजय वडेट्टीवार यांना कॅबिनेट मंत्रीपद जाहीर झाल्यावर सुस्त पडलेल्या त्यांच्या समर्थक आणि शुभचिंतकांमध्ये पुन्हा एकदा नवसंजिवनी संचारली आहे. शनिवारी त्यांचे शहरात आगमन होणार होते. त्याची मात्र जय्यत तयारी शहरात दिसून आली. शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, याच समर्थक आणि शुभचिंतकांना 12 डिसेंबर या दिवशी वडेट्टीवारांच्या वाढदिवसाचा सोयीस्करपणे विसर पडला होता. अपवाद वगळता त्यांना शुभेच्छा देणारी फलके, बॅनर कोणीही लावले नव्हते. कारण त्यावेळी ते कॅबिनेट मंत्री नव्हते, तर ते साधे आमदार होते. या स्वार्थी सत्तेच्या लपंडावाची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली.
स्वार्थाची सत्ता! वडेट्टीवारांच्या वाढदिवसाचा पडला होता विसर, मंत्री होताच शहरभर फलकांचा महापूर - वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर या पदाची जबाबदारी वडेट्टीवार यांना देण्यात आली. त्यामुळे राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यावर वडेट्टीवार यांना कॅबिनेटमंत्री पद मिळणार हे जवळपास निश्चितच होते. मात्र, नेहमी सत्तेच्या लाभ आपल्या झोळीत पाडून घेणाऱ्याना तसा विश्वास नसतो. सत्ता कुणाचीही येवो त्यासोबत जुळवून घेण्याची अशा वर्गाची मानसिकताच असते. त्याला वडेट्टीवार देखील अपवाद नव्हते. हा प्रसंग पाहण्याचा योग सुद्धा वडेट्टीवार यांच्या नशिबात आला.
विजय वडेट्टीवार यांचा केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला दबदबा आहे. सेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली. यावेळी त्यांना काँग्रेसने विधानसभेचे उपगटनेतेपद देण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर या पदाची जबाबदारी वडेट्टीवार यांना देण्यात आली. त्यामुळे राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यावर वडेट्टीवार यांना कॅबिनेटमंत्री पद मिळणार हे जवळपास निश्चितच होते. मात्र, नेहमी सत्तेच्या लाभ आपल्या झोळीत पाडून घेणाऱ्याना तसा विश्वास नसतो. सत्ता कुणाचीही येवो त्यासोबत जुळवून घेण्याची अशा वर्गाची मानसिकताच असते. त्याला वडेट्टीवार देखील अपवाद नव्हते. हा प्रसंग पाहण्याचा योग सुद्धा वडेट्टीवार यांच्या नशिबात आला.
12 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस आला, तेव्हा कॅबिनेटची यादी जाहीर व्हायची होती. ते साधे आमदार होते. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसावर अभिष्टचिंतन करणारे काही थोडकेच होते. वडेट्टीवार यांचा त्या दिवशी वाढदिवस होता, हे अनेकांना माहितीच पडले नाही. कारण शहरात त्यांच्या समर्थकांनी आणि शुभचिंतकांनी तसे फलकच लावले नाहीत. मात्र, कॅबिनेट मंत्रीपद जाहीर होताच त्यांचे मोठमोठे फलक शहरात लागायला सुरुवात झाली आहे. 4 जानेवारीला त्यांचे आगमन शहरात होणार होते. यावेळी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी वडेट्टीवार यांचा दौरा रद्द झाला. यामुळे वडेट्टीवार यांच्या समोर आपली हजेरी लावून त्यांना 'गोड' शुभेच्छा देणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आता त्यांना पुन्हा एकदा जय्यत तयारी करावी लागेल.: