चंद्रपूर- चंद्रपुरात आजचा दिवस सर्वाधिक उष्ण ठरला आहे. आज ४६.५ डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून या वर्षीचे हे सर्वाधिक तापमान आहे. अकोल्यानंतर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ही चंद्रपुरात करण्यात आली आहे.
चंद्रपुरात उन्हाचा कहर; तापमान आतापर्यंत सर्वाधिक ४६.५ अंशावर
शुक्रवारी चंद्रपूरचे तापमान ४५.६ अंश एवढे होते. तर आज उन्हाने कहरच केला. तब्बल एक डिग्रीची वाढ होऊन हे तापमान ४६.५ अंशावर पोहोचले आहे. या वर्षीचा आजपर्यंतचा हे उच्चांकी तापमान आहे.
येणारे काही दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम असण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूरच्या तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले आहे. नागरिक अत्यंत तातडीचे काम असल्यासच बाहेर पडत आहेत. बाहेर निघताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण चेहरा आणि शरीर झाकूनच लोक बाहेर पडतानाचे चित्र दिसत आहे.
शुक्रवारी चंद्रपूरचे तापमान ४५.६ अंश एवढे होते. तर आज उन्हाने कहरच केला. तब्बल एक डिग्रीची वाढ होऊन हे तापमान ४६.५ अंशावर पोहोचले आहे. या वर्षीचा आजपर्यंतचा हे उच्चांकी तापमान आहे.