चंद्रपूर : मागील चोवीस तासांत चिमूर तालुक्यात ( Heavy rain in Chimur taluka ) झालेल्या संततधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती ( Flood situation) निर्माण झाली आहे. अनेक गांवात पाणी साचले असून एकूण 13 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील उमा नदी ( Uma River ) सातनाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन चिमूर शहरास पाण्याने वेढा ( Chimur city surrounded Flood ) दिला. ज्यात पेठ मोहल्ला, चावडी, खाती कामठा, मानीक नगर, क्रांती नगर, उप जिल्हा रुग्णालय व परीसरातील घरात पाणी घुसले. तसेच तालुक्यातील अनेक गांवाना पुरांचा फटका बसला आहे. तसेच नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव, शेडेगाव, गडपिपरी, खरकाडा, पिपंळनेरी, काग-सोनेगाव या गावांनाही पाण्याने वेढले आहे. प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने अनेक कुटूंबांना सुरक्षीतस्थळी हलविले. पुरग्रस्तांची तात्पुरत्या स्वरूपात शहिद बालाजी रायपुरकर सभागृह ( Shaheed Balaji Raipur Hall ) येथे व्यवस्था केल्याची माहीती नगर परीषद अधिक्षक प्रदिप रणखांब यांनी दिली.
हेही वाचा -Indore Amalner ST Accident : इंदोर-अमळनेर एसटी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत
याही गावांना बसला फटका -चिमूर तालुक्यातील कवडशी, केसलापुर, अमरपुरी भान्सुली, सरडपार, चिखलापार, नेरी, नवतळा, कोटगाव, पांढरवानी, किटाळी (तुकुम), भिसी इत्यादी गावासह अनेक गावांना पुरांचा फटका बसला आहे. चिमूर तालुक्यातील जांभुळधाट, कोटगाव, नवतळा, चिमूर-नेरी, नेरी-शिवन, पायली, खडसंगी, मुरपार, मिनझरी, अमरपुरी,भान्सुली, चिमूर-भिसी हे मार्ग बंद झाले आहेत.
41 जणांना सुरक्षित स्थळी हलवले -चिमूर नगर परीषदेचे ( Chimur Nagar Parishad ) अधिक्षक प्रदिप रणखांब, अभियंता राहुल रणदिवे यांनी पुढाकार घेऊन सोनेगाव बेगडे येथील ५, गांधी वार्ड येथील ५, खाती कामठा येथील १८ तथा गुरुदेव वार्ड येथील १३ स्त्री, पुरुष बालकांचे रेस्कु करून एकूण 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.