महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Flood Situation in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती तालुक्याला पुराचा वेढा, घरांची पडझड, जनजीवन विस्कळीत - Heavy Rains Chandrapur

Flood Situation in Chandrapur : जिल्ह्यात नद्या संततधार पावसाने पुराचा फटका बसला आहे. चिमूर पाठोपाठ भद्रावती, वरोरा आणि मूल तालुक्यातील अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. माजरी या गावाला पुराने वेढले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला तालुक्याला पुराचा वेढा
चंद्रपूर जिल्ह्याला तालुक्याला पुराचा वेढा

By

Published : Jul 20, 2022, 8:16 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील नद्या संततधार पावसाने फुगल्या असून जिल्ह्यात पुराचा फटका बसला आहे. चिमूर पाठोपाठ भद्रावती, वरोरा आणि मूल तालुक्यातील अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. माजरी या गावाला पुराने वेढले आहे. ( Flood Situation in Chandrapur ) तर बेलसनी हे गाव पुर्णतः पाण्याखाली गेले आहे. ( Heavy Rains Chandrapur ) या सर्व ठिकाणी बचावकार्य सुरू असून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला तालुक्याला पुराचा वेढा

पावसामुळे नदी- नाले दुथडी भरले- संततधार पावसामुळे आधीच नदी- नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिराना, कोराडी आणि वर्धा नदीला पुर आला आहे. ( Heavy Rains Chandrapur ) त्यामुळे माजरीसह परिसरातील अनेक गावांना पुराचा विळखा बसला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ( Flood Situation in Chandrapur ) प्रशासनाचे मदत कार्य सुरु आहे. चंद्रपूर- वणी मार्ग बंद झाला आहे. तसेच बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजूरा हैदराबाद मार्ग बंद करण्यात आले आहे.

11 गावांना पुराने वेढा दिला - सोमवारी मध्यरात्री माजरीच्या तेलुगु दफाई, आंबेडकर वार्ड, शांती कॉलोनी, चैतन्य कॉलोनी, दफाई क्रमांक- 1, एकता नगर या भागात पाणी घुसायला सुरूवात झाली. त्यामुळे रात्रीच लोक घरातील सामान आवरुन बाहेर पडले. त्यांनी सुरक्षित स्थळी जाऊन आश्रय घेतला. जे पुरात अडकले, त्यांना आज सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वेकोलि वसाहतीमधील खाली सदनिका आणि महावीर शाळेत त्यांना ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केले आहे. माजरी लगतच्या पूरामुळे पळसगाव, पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराणा, कुचना, नागलोन, विसलोन, चालबर्डी, कोंढा, देऊरवाडा या 11 गावांना सुद्धा पुराने वेढा दिला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पहिल्यांदाच माजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पोलीस ठाण्यापर्यंत पुराचे पाणी पोहचले. पुरामुळे अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वेकोलिचे कामगार सुद्धा कामावर पोहोचले नाही. परिणामी वेकोलितील उत्खनन बंद होते. माजरी परिसरात 1994 च्या पुराची पुनरावृत्ती झाली आहे. नागरिक सध्या भयभीत झाले आहे. कोराडी नाल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पळसगावत पाणी शिरले. काही नागरिक पुरात अडकले होते. परंतू चंद्रपूर येथून बचाव पथक दाखल झाले आणि या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील चारवट- हडस्ती मार्गावर ईरई नदीचे 4 फुट पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग बंद आहे. या तालुक्यातील अनेक गावात अद्याप पुरसदृश्य परिस्थिती आहे.

चिमूर तालुक्यात 500 वरती घरांची पडझड -चिमूर तालुक्यामध्ये 1 जून ते 19 जुलैपर्यंत सरासरी 701 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील उमा नदी, गोधनी नदी तसेच सातनाला आणि हत्तीघोडा नाल्याला आलेल्या पुरामुळे एकूण 41 गावे पुरसदृश्य परिस्थिती आहे. पुरामुळे नेरी, सिरपूर, कळमगाव, पांजरेपार, बाम्हणी, सावरगाव, मालेवाडा, वाढोणा तर महालगाव काळू या गावातील एकूण 60 कुटुंबे बाधित झाली आहे. 208 नागरिकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. तालुक्यातील खडसंगी, नेरी, चिमूर, मासळ, जांभूळघाट, भिसी व शंकरपूर या गावातील 547 घरे व 38 गोठे अंशतः बाधित झाली आहेत. 17 घरे आणि 3 गोठे पूर्णतः पडली आहेत. कृषी विभागाकडून केलेल्या प्राथमिक तपासणीच्या अनुषंगाने 33 हजार 645 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नवतळा, चिखलापार, गदगाव या गावातील एकूण 23 जनावरांचे नुकसान झाले आहे.

मूल येथे 16 शेतकऱ्यांचा जीव वाचला -मूल तालुक्यातील ताडाळा येथील 16 शेतकरी पुराच्या पाण्यामुळे शेतातील बांद्यावर अडकले होते. ताडाळा येथील शेतकरी विलास चिलकापूरे हे आपल्या मुलासह आणि शेतकऱ्यासह भातरोवणीला शेतात गेले होते. लागूनच उमा नदी असल्यामुळे आणि नदीला पूर आल्यामुळे चारही बाजूने पाणी वेढले. त्यामुळे काल सकाळपासून शेतकरी शेतातील बांधावरच अडकले होते. ही माहिती मूल प्रशासनाला होताच मूल प्रशासन रेस्क्यू टीमला पाचारण करून या सर्व शेतकऱ्यांना बोटीने सुखरूप आणण्यात आले आहे. यावेळी मूलचे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, MSCB प्रशासन, नगरपालिका प्रशासन संपूर्ण प्रशासन यावेळी उपस्थित होते.

वरोरा येथे 400 लोकांना हलविले -मौजे सोईट येथील 132 लोकांना SDRF चे टीमने लोकांना सुखरूप गावाबाहेर हलवले आहे. करंजी मधील 250 नागरिकांना साई मंगल कार्यलय, वरोरा येथे हलविण्यात आले असून आणि पुन्हा उर्वरीत नागरिकांना सुद्धा हलविण्याची कार्यवाही सुरु आहे.

माजरी कॉलरी वसाहत पाण्याखाली -भद्रावती तालुक्यातील पळसगाव, थोराना, मणगाव, पाटाळा, कोंढा, कोची, पिपरी, घोनाड, चारगाव, माजरी कॉलरी हे वर्धा नदीच्या तसेच सीरना नदीच्या तीरावरील 11 गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. दुपारी वर्धा व लोअर वर्धा येथील धरनाचे 31 दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे वर्धा नदीच्या तीरावरील संपूर्ण गावांना पाण्याने वेढले आहे. वर्धा नदीचे पाणी शिरणा नदीमध्ये आल्याने माजरी वेकोलि वसाहत वस्तीतील 6 प्रभागात 7 ते 8 फुटापर्यंत घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच पळसगाव येथील 200 लोकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. या गावातील कुटुंबांना एकता नगर, चारगाव वसाहत तसेच माजरी येथील नेहरू क्लब, महावीर शाळा, कुसना येथे हलविण्यात आले आहे. प्रशासनातर्फे तहसीलदार अनिकेत सोनवणे नायब तहसीलदार शंकर भांदककर तसेच इतर कर्मचारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पुराचा फटका चिमूर तालुक्यानंतर भद्रावती तालुक्याला बसला -जिल्ह्यातील पुराचा फटका चिमूर तालुक्यानंतर भद्रावती तालुक्याला बसला आहे. येथील बेलसनी गाव हा संपूर्ण पुराने वेढला असून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सद्यस्थितीत 250 नागरिकांना बोटीच्या माध्यमातून हलविण्यात आले आहे. तर लोकांना वाचविण्याचे काम सुरू आहे. येथे बोटीत बसण्यासाठी नागरिकांच्या रांगाच- रांगा लागल्या असून त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भद्रावती तालुक्यातील माजरी आणि बेलसनी या गावाला पुराचा मोठा फटका बसला आहे. दुपारीपर्यंत बेलसनि हे गाव संपूर्णत पुराने वेढले गेले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हळविण्याचे काम सुरू आहे. मात्र त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचावकार्य तोकडे पडत आहे.

हेही वाचा -Fraud of MLAs : कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details