चंद्रपूर -मंगळवारला दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने राजुरा तालुक्यतील भेदोडा गावाला झोडपून काढले. वादळामुळे झाडे कोसळली. अनेक घरावरील पत्रे उडाली, तर झाडे वीजतारावर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
राजुरा तालुक्याला वादळी पावसाने झोडपले - rajura rain
राजुरा तालुक्यातील भेदोळा गावात दुपारच्यावेळी वादळी पावसाचे आगमन झाले. यात विविध मार्गावरील अनेक झाडे कोलमडून पडली. अनेक घरावरील पत्रे उडाली. वीजतारांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
राजुरा तालुक्यातील भेदोळा गावात दुपारच्यावेळी वादळी पावसाचे आगमन झाले. यात विविध मार्गावरील अनेक झाडे कोलमडून पडली. अनेक घरावरील पत्रे उडाली. वीजतारांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. राजाराम दुर्गे, बाबुराव दुर्गे, प्रभाकर गादंगीवार, जयंत कोडावार यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच छाया दुर्गे, सुरेश गज्जलवार, संतोष मुरकुटलावार, तानेबाई बोबडे, मल्लेश गड्डमवार, संजय टेकाम यांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. वादळासोबत गारपीट झाल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. या वादळी पावसात गावाचे मोठे नुकसान झाले आहे.