चंद्रपूर- वातावरण बदलाने चंद्रपुरात मागील दोन दिवसात ठिकठिकाणी पाऊस झाला. आजही जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास झालेल्या या अचानक पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.. नागरिकांची तारांबळ - चंद्रपूर तापमान
मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले होते. आजही शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली. जवळपास दोन तास हा पाऊस सुरू होता.
हेही वाचा-बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग
मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले होते. आजही शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली. जवळपास दोन तास हा पाऊस सुरू होता. सध्या चंद्रपुराचे तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे. अशातच पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून चंद्रपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.