चंद्रपूर : चंद्रपूर ( Heavy rain in chandrapur ) येथे पुलावरून पाणी जात असताना अतिउत्साहाच्या भरात ऑटो चालकाने प्रवाशांसह ऑटो चालकाने ऑटो तसाच पाण्यात पुढे नेला. ( Takli village ) अखेरीस त्याचा अतिउत्साह महागात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात तो ऑटो अडकल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात ( passengers into the water ) आला होता. मात्र, सुटीवर गावी आलेल्या जवानाच्या धाडसामुळे पाचही लोकांचे प्राण वाचविण्यात यश ( save the lives of people ) आले. निखिल सुधाकर काळे, ( Soldier Nikhil Sudhakar Kale ) असे या जवानाचे नाव असून, तो मराठा बटालियनमध्ये सेवेत आहे. ही घटना टाकळी या गावाची आहे. ( Soldiers saved Lives of five people )
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस : सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. काल टाकळी नाल्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. यावेळी पानवडाळाकडे जाणारा ऑटो आला. त्यात चार प्रवासी होते. अतिउत्साहाच्या भरात या ऑटोचालकाने ऑटो पुलावरूनच पाणी असताना पुढे चालवला. मात्र, पाण्याची पातळी आणि प्रवाह अधिक असल्याने त्यात तो अडकला.