चंद्रपूर- जिल्ह्यात नागरिक सध्या 'हिवसाळ्या'चा अनुभव घेत आहेत. ऐन थंडीच्या वेळेवर पावसाच्या हजेरीमुळे चंद्रपूरकर चांगलेच गोंधळून गेले आहेत. अशावेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर घालावे की पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट हाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
ऐन थंडीत पाऊस, रेनकोट घालावा की स्वेटर? चंद्रपूरकरांना प्रश्न - अवकाळी पाऊस
जिल्ह्यात नागरिक सध्या 'हिवसाळ्या'चा अनुभव घेत आहेत. ऐन थंडीच्या वेळेवर पावसाच्या हजेरीमुळे चंद्रपूरकर चांगलेच गोंधळून गेले आहेत
ऐन थंडीत पाऊस
गेल्या काही दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. जिल्ह्यातील तापमान 5 डिग्रीपर्यंत आले आहे. यातच आता पावसाची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. अशात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.