महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुराला पुराचा फटका; बचाव पथकांनी ३ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले - sdrf rescue bramhapuri

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून हे बचावकार्य सुरू आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि नागभीड तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यातही ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांचे मोठे नुकसान झाले आहे.

बचाव कार्य करताना बचाव पथक
बचाव कार्य करताना बचाव पथक

By

Published : Aug 31, 2020, 8:07 PM IST

चंद्रपूर- गोसेखुर्द धरणाची सर्व दारे उघडण्यात आल्याने याचा मोठा फटका ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांना बसला आहे. तालुक्यातील लाडज, पिंपळगाव, बाभूळगावसह अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. येथील नागरिकांना युद्धपातळीवर वाचविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत ३ हजार १५९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

बचाव कार्य करताना बचाव पथक

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून हे बचावकार्य सुरू आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली आणि नागभीड तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यातही ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव, खरकाडा, निलज, लाडज, बेलगाव, कोलारी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. या सर्व गावांचा संपर्क तुटला असून गावांमध्ये पाणी शिरले आहे.

गांगलवाडी-आवळगाव, देऊळगाव-कोलारी, पारडगाव-ब्रम्हपुरी या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने मार्ग बंद झालेला आहे. येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी कालपासून (३० ऑगस्ट) बचावकार्य सुरू करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापनच्या ३ पथकांच्या माध्यमातून हे कार्य सुरू होते. त्याचबरोबर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनची ४ पथके देखील बचावकार्यासाठी दाखल झालेली आहेत. सध्या प्रशासनाकडे ९ बोटी असून त्यांच्या सहायाने बचावकार्य सुरू आहे. आणखी २० बोटींची मागणी आहे. शेजारी जिल्ह्यातून बोट मागविण्यात आल्या आहेत. निर्वासितांसाठी ४ ठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. सध्या पाण्याचा विसर्ग कमी झाला असून काही तासात पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-ब्रम्हपुरी तालुका पुराच्या विळख्यात; अनेक गावांचा संपर्क तुटला, बचावकार्य सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details