महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 26, 2022, 6:56 PM IST

Updated : Apr 26, 2022, 7:07 PM IST

ETV Bharat / state

उष्णतेच्या लाटेत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्था व्हेंटिलेटरवर; आयसीयू, जळीत वॉर्डातील एसी बंद, कुलर तोकडे

उष्णतेमुळे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical Collage and Hospital Chandrapur) आयसीयू आणि जळीत वॉर्डातील रुग्ण मरणयातना सहन करत आहेत. कारण या वॉर्डातील एसी पूर्णपणे बंद (No AC In ICU Ward) आहेत, कुलरची नाममात्र व्यवस्था करण्यात आली आहे. आधीच मरणाच्या दारात उभे असलेल्या रुग्णांची अशी क्रूर हेळसांड या ठिकाणी होत आहे.

Chandrapur Medical College
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू

चंद्रपूर - सध्या चंद्रपूर शहर हे उष्णतेने होरपळून निघत आहे. 45 डिग्रीच्या वर पारा (Chandrapur Temperature) गेला असून, जगातील सर्वात उष्ण शहरांच्या (Chandrapur Hottest City) यादीत चंद्रपूर अग्रस्थानी येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक बाहेर पडण्यासही कचरत आहेत. मात्र, दुसरीकडे याच उष्णतेमुळे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Medical Collage and Hospital Chandrapur) आयसीयू आणि जळीत वॉर्डातील रुग्ण मरणयातना सहन करत आहेत. कारण या वॉर्डातील एसी पूर्णपणे बंद (No AC In ICU Ward) आहेत, कुलरची नाममात्र व्यवस्था करण्यात आली आहे. आधीच मरणाच्या दारात उभे असलेल्या रुग्णांची अशी क्रूर हेळसांड या ठिकाणी होत आहे.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

एसीची सुविधा कागदावरच -चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील एसीची सुविधा ही केवळ कागदावर सुरू आहे. प्रत्यक्षात बहुतांशी एसी हे शोभेची वास्तू ठरलेले आहेत. मात्र ज्या ठिकाणी याची अत्यावश्यकता आहे त्या ठिकणचे एसी देखील अनेक महिन्यापासून बंद आहेत. आयसीयू आणि जळीत वॉर्डातील एसी पूर्णपणे बंद आहेत. विशेष म्हणजे चंद्रपुर दररोज उष्णतेचा उच्चांक गाठत आहे. 45 डिग्रीच्या वर तापमान गेले असून दिवसेंदिवस तापमानात चिंताजनकरित्या वाढ होत आहे. याची दाहकता अजूनही चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला लक्षात आलेली नाही. त्यामुळे अजूनही हे एसी सुरू करण्यासाठीचे काहीही प्रयत्न झाले नसल्याचे 'ईटीव्ही भारत'च्या पाहणीत समोर आले आहे. येथे कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ते ही नाममात्र. जळीत वॉर्डात केवळ एकच कुलर आहे. यात केवळ चार ते पाच रुग्णांना थंडावा मिळतो, मात्र इतर 10 बेडसाठी कुठलीही व्यवस्था नाही.

गंभीर रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागतायेत - आयसीयूमध्येही हाच प्रकार आहे. दोन एसी पूर्ण बंद आहेत, या वॉर्डातील एका भागातच कुलर लावला आहे तर दुसऱ्या बाजुतील रुग्णांना केवळ पंख्याची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, या वॉर्डात गंभीर अवस्था असलेले रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी लोकांना कृत्रिमपणे श्वासोच्छवास देण्यात येत आहे. असे असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या असंवेदनशीलतेपणामुळे या गंभीर रुग्णांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. याबाबत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे यांच्याशी संपर्क केला असता सुरुवातीला त्यांनी कुलरची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना वस्तुस्थिती सांगताच त्यांनी ही बाब मान्य केली. एसी बंद असून अतिरिक्त कुलरची व्यवस्था तत्काळ केली जाणार असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा -चंद्रपूर : कोरोनाच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय 'व्हेंटिलेटर'वर.. सरकारने प्रक्रियेत गुंडाळली वैद्यकीय अव्यवस्था

Last Updated : Apr 26, 2022, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details