महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2020, 8:56 AM IST

ETV Bharat / state

चंद्रपूरचे नाव कोरोनाच्या यादीतून त्वरित वगळा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाग्रस्तांच्या यादीत चंद्रपूरचा उल्लेख म्हणजे जिल्हा प्रशासन आणि नागरिकांचे प्रयत्न कमी लेखणारा आहे. त्यामुळे हा उल्लेख त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.

Hansraj ahir
चंद्रपूरचे नाव कोरोनाच्या यादीतून त्वरित वगळा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चंद्रपूर- जिल्हा कोरोनापासून मुक्त असूनही जिल्ह्याला कोरोनाच्या यादीत टाकण्यात आले. इंडोनेशियातून आलेले दाम्पत्य नागपुरात कोरोनाग्रस्त आढळून आले. ते कोरोनामुक्त झाले असून आणखी एकही कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळलेला नाही. तेव्हा जिल्ह्याला या यादीत ठेवू नये, अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.

इंडोनेशियातून आलेले दाम्पत्य यापूर्वी कधीही चंद्रपूरला आले नाही. मात्र, ते मुळचे चंद्रपुरातील असल्याच्या कारणाने जिल्ह्याचे नाव कोरोनाग्रस्ताच्या यादीत टाकण्यात आले. आता तेही कोरोनामुक्त झाले आहेत. असे असताना देखील कोरोनाग्रस्तांच्या यादीत चंद्रपूरचे नाव कायम आहे. हा उल्लेख म्हणजे जिल्हा प्रशासन आणि नागरिकांचे प्रयत्न कमी लेखणारा आहे. त्यामुळे हा उल्लेख त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.


कोविड - 19 विषाणूचे संकट संपूर्ण देशात असतांना चंद्रपूर जिल्ह्यात अजून एकही रुग्ण नाही. हे या जिल्ह्यातील अधिकारी व नागरिकांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी कोरोनामुक्त जिल्हा करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहे. असे असतांना covid19india.org या संकेतस्थळावर चंद्रपूर जिल्ह्यात 2 रुग्णांची नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर 2 रूग्णांची नोंद या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘अन्य’ विकल्पात करून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी व नागरिकांनी कोरोनाविरोधात केलेल्या युध्दाचा सन्मान करावा, अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details