महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहिरांच्या 'खदखदी'तून मुनगंटीवारांवर कटाक्ष; आत्मचिंतन करण्याचे केले आवाहन

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात अहीर यांना अत्यंत कमी मते मिळाली. अहिरांसाठी हा अनपेक्षित धक्का होता.

hansaraj-ahir-on-sudhir-mungantiwar-in-chandrapur
hansaraj-ahir-on-sudhir-mungantiwar-in-chandrapur

By

Published : Jan 3, 2020, 9:36 AM IST

चंद्रपूर- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपच्या पिछाडीवरून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांनी प्रकाशित केलेल्या जाहिरातीतून चंद्रपूर आणि लगतच्या जिल्ह्यांत भाजपची कशी धूळधाण झाली, हे नकाशाच्या माध्यमातून दाखवले आहे. त्यात त्यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पिछाडीवर गेली होती. त्याचेच आत्मचिंतन करणारी जाहिरात अहीर यांनी प्रसिध्द केली. ज्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू झाली आहे.

अहिरांच्या खदखदीतून मुनगंटीवारांवर कटाक्ष

हेही वाचा-अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात अहीर यांना अत्यंत कमी मते मिळाली. अहिरांसाठी हा अनपेक्षित धक्का होता. तशी मनातली खदखद त्यांनी बोलूनही दाखविली. एवढेच नव्हे तर पराभवाच्या शंभराव्या दिवशी 1 सप्टेंबरला त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही टाकली. राज्यात सर्वत्र मोदी लाट असताना काँग्रेसमुक्त झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा पराभव अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले.

माझा पराभव मी स्वीकारला पण भाजपचा पराभव अनपेक्षित, अनाकलनीय आणि असह्य असल्याचेही त्यांनी म्हटले. अप्रत्यक्ष हा मुनगंटीवार यांच्यावरच कटाक्ष होता. कारण अहीर हे त्यावेळी केंद्रीय मंत्री असले तरी मुनगंटीवार हे राज्याचे अर्थ, वन आणि नियोजन मंत्री होते. जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे होते. त्यामुळे भाजपच्या जिह्यातील राजकारणात त्यांचे निर्विवाद वर्चस्व होते. यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा जिल्ह्यात दारुण पराभव झाला. 6 जागांपैकी भाजपकडून मुनगंटीवार अन् बंटी भांगडीया हे दोघेच विजयी झाले. त्यातही भाजपच्या मतदानामध्ये कमालीची घट झाली. मुनगंटीवार यांना आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त आमदार निवडून आणणे आवश्यक होते. मात्र, जे होते ते आमदार सुद्धा निवडून येऊ शकले नाही. मुनगंटीवार यांच्या प्रतिमेचा प्रभावही परिस्थिती बदलू शकला नाही. त्यातच अहीर यांनी आपल्या जाहिरातीतून मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या प्रश्न उपस्थित केला आहे. ज्याची चर्चा समाजमाध्यमांत आणि भाजपच्या गोटात मोठ्या प्रमाणात होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details