चंद्रपूर- ब्रम्हपुरी तालुक्यात आज शुक्रवारी अवकाळी पावसाने थैमान घातले. दुपारच्या वेळी गारपीटसह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कापूस, तुरी आणि बाहेर ठेवलेल्या शेतमालाचे पावसात भिजून मोठे नुकसान झाले.
अवकाळी संकट : ब्रम्हपुरीत गारपीटीसह मुसळधार पाऊस - ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी तालुक्यात आज शुक्रवारी अवकाळी पावसाने थैमान घातले. दुपारच्या वेळी गारपीटसह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
![अवकाळी संकट : ब्रम्हपुरीत गारपीटीसह मुसळधार पाऊस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2461023-321-36887d2a-e27c-4770-88a5-b24f3aab7109.jpg)
गारपीट
गारपीट
काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर शहरात गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला होता. यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली होती. विजेचे खांब पडल्याने विजेच्या तारा तुटून शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अशातच आज ब्रम्हपुरी शहरात या घटनेची पुनरावृत्ती झाली.
अचानक झालेल्या गारपीटीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गारांच्या मारामुळे अनेकांना किरकोळ दुखापतही झाल्या. यात सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.