चंद्रपूर -जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. राजूरा आणि जिवती तालुक्याला शनिवारी जोरदार गारपीट आणि वादळी पावसाने झोडपून काढले. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.
राजूरा, जिवती तालुक्याला वादळी पावसाने झोडपले; गारपिटीमुळे पिकांचे नुकसान - चंद्रपूर अवकाळी पाऊस
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आणि जिवती तालुक्याला शनिवारी जोरदार गारपीट आणि वादळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गारपीट
हेही वाचा -जिल्ह्यातील जंगलात गारपिटीने तब्बल ५ हजाराहून अधिक पोपटांचा मृत्यू
शनिवारी सायंकाळी अचानक पावसाने जोर धरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
Last Updated : Mar 15, 2020, 11:38 AM IST