महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण - ब्रम्हपूरी चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ब्रम्हपूरी तालुक्यात एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या आजोबांनीच लौंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चंद्रपूर
आजोबाने केला नातीवर बलात्कार

By

Published : Feb 7, 2020, 7:31 AM IST

चंद्रपूर-राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात सख्ख्या आजोबानेच सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पीडित मुलीची आई मुलगी लहान असतानाच मरण पावली आहे. तिचे वडील कामासाठी बाहेर गावी गेले असता, तिच्या संगोपनाची जबाबदारी असलेल्या आजोबानेच तिच्यासोबत हे दुष्कृत्य केले आहे.

हेही वाचा... "हिंगणघाट पीडितेच्या डोळ्यांची सूज कमी मात्र श्वसन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता"

पीडित मुलगी शाळेत जेवणाच्या सुटीमध्ये उपाशी राहिली असता, शिक्षकांनी तिला कारण विचारले. तेव्हा तिने शिक्षकांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर शिक्षकांनी याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी याबाबतची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दिली.

यानंतर पोलिसांनी 60 वर्षीय नराधम आजोबाला अटक केली आहे. तसेच पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा... शीना बोरा हत्याकांड : मुंबई उच्च न्यायालयाकडून पीटर मुखर्जीला जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details