चंद्रपूर - गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणुचे रुग्ण वाढत आहेत. अशा परीस्थितीमध्ये १६ जून पासून विद्यापीठाची होणारी अंतिम परीक्षा रद्द करून कालावधी दोन ते तीन महिने वाढवावा, अशी मागणी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना करण्यात आली आहे. ही मागणी उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय ओ.बी.सी युवा महासंघाच्या तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आली आहे.
देश व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. पूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा १६ जुन पासून होणार असल्याची माहिती आहे.