महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 26, 2020, 8:29 PM IST

ETV Bharat / state

'निधीचा गैरवापर करण्यासाठी संगणक चालकाविरोधात सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र'

आधार लिंकीगसाठी संगणक चालकाने पंतप्रधान आवास योजनेतील गरीब लाभार्थ्यांकडून पैसे उकळले अशी, लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार नोंदवली आहे. मासिक सभेत या विषायवर खडाजंगी झाली. भाजप आणि काँग्रेस आमने-सामने उभे झाले आहेत. संगणक चालक तिमाडे यांचे पती आणि ग्रामपंचायत सदस्य असलेले रामकृष्ण सांगडे यांनी याबाबत गोंड पिंपरीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले.

Ramakrishna Sangade
रामकृष्ण सांगडे

चंद्रपूर -गोंड पिंपरीत ज्या लाभार्थ्यांनी संगणक चालकाची तक्रार केली आहे. त्यांची जर आधार जोडणी झालेली नाही, तर त्यांनी पैसे कशाचे दिले? संगणक चालका विरोधातील तक्रार शंभर टक्के खोटी आहे. चौदाव्या वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतमध्ये पडून आहे. संगणक चालक ग्रामपंचायत सदस्य असल्याने त्या निधीचा गैरवापर करताना सत्ताधाऱयांना अडचणी येत आहेत. त्यामुळे संगणक चालकाला निलंबीत करण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण सांगडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

'त्या' लाभार्थ्यांची आधार जोडणी झालीच नाही

आधार लिंकीगसाठी संगणक चालकाने पंतप्रधान आवास योजनेतील गरीब लाभार्थ्यांकडून पैसे उकळले अशी, लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे तक्रार नोंदवली आहे. मासिक सभेत या विषायवर खडाजंगी झाली. भाजप आणि काँग्रेस आमने-सामने उभे झाले आहेत. संगणक चालक तिमाडे यांचे पती आणि ग्रामपंचायत सदस्य असलेले रामकृष्ण सांगडे यांनी याबाबत गोंड पिंपरीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले. ज्या लाभार्थ्यांनी संगणक चालकाची तक्रार केली आहे, त्यांची आधार जोडणी झालेली नाही. त्यामुळे पैसे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी म्हटले.

चौदाव्या वित्त आयोगातील 29 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीत तीन वर्षांपासून पडून आहे. तिमाडे या संगणक चालक आणि ग्रामपंचायत सदस्य असल्याने या निधीचा गैरवापर करताना सत्ताधाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे षडयंत्र रचून तिमाडे यांना काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप सांगडे यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details