चंद्रपूर - हिंगणघाट येथे एका महिला शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे औरंगाबाद, पनवेल येथे घडलेल्या घटना देखील मन सुन्न करणाऱ्या आहेत. चंद्रपूर येथेही एक चिमुकलीचे तिच्या आजोबांनी लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. अशा सर्व घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.
चंद्रपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांची प्रतिक्रिया... हेही वाचा.... संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एक प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नगराळे नावाच्या नराधमाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना मनाला सुन्न करणारी असून अतिशय दुर्दैवी असल्याचे, बेबीताई उईके यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेतील आरोपींला फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याच प्रणाणे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात आजोबानेच आपल्या सात वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण केले. ही घटना सुद्धा माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या आणि अशा अनेक घटनांचा निषेध व्यक्त करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी, अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तरच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून सांगण्यात आले.
तसेच या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात पाठवण्यात आले आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शहराध्यक्ष ज्योतीताई रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, कार्याध्यक्ष चारुशीला बरसागडे, जिल्हा सचिव हर्षा खैरकर, सरस्वती गांवडे, दीपाली दुर्गे, राणी राव,सावित्री मेश्राम, सुनंदा पाटील व इतर महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा... औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू