महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाकापेक्षा मोती जड', उमेदवाराला आठशेच्या बॅनरसाठी बाराशे रुपयांचा जाहिरात कर - गडचांदूर निवडणूक 2019

गडचांदूर नगरपरिषदेने आकारलेल्या जाहिरात करामुळे उमेदवाराला आठशे रुपयांच्या बॅनरवर चक्क बाराशे रुपयांचा जाहिरात कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेने आकारलेल्या कराकडे पाहुन उमेदवाराला 'नाकापेक्षा नथणी जड' असे बोलण्याची वेळ आली आहे.

Gadchandur Municipal Council Election
गडचांदूर नगरपरिषद निवडणूक

By

Published : Dec 26, 2019, 3:12 PM IST

चंद्रपूर -निवडणूक म्हटल्यावर बॅनरबाजी ठरलेली असते. मात्र गडचांदूर नगरपरिषद निवडणूकीत उमेदवार असलेल्या एका उमेदवारासाठी ही बॅनरबाजी चांगली महागात पडत आहे. गडचांदूर नगरपरिषदेने बॅनरवर आकारलेल्या जाहिरात करामुळे, विक्रम येरणे या उमेदवाराला आठशे रुपयांच्या बॅनरसाठी चक्क बाराशे रुपयांचा कर द्यावा लागणार आहे. तेव्हा आता नगरपरिषदेने आकारलेल्या या जाहिरात करामुळे उमेदवाराने 'नाकापेक्षा मोती जड' झाल्याची टीका केली आहे.

गडचांदूर नगरपरिषदेतील उमेदवार विक्रम येरणे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... "बोलाचीच कढी बोलाचाच भात"

चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर नगरपरिषदेसाठी नऊ जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यासाठी 103 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख पक्षांप्रमाणेच काही अपक्षांनीही यावेळी कंबर कसली आहे. शहरात बॅनरबाजीमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे. मात्र, अशातच नगरपरिषदेच्या नव्या निर्णयाने मात्र उमेदवार मंडळी चांगलेच खचले आहेत.

हेही वाचा... बायको सोडून गेली, प्रेयसीचेही लग्न झाल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

गडचांदूर नगरपरिषदेने बॅनरवर प्रति स्केअर फूट 15 रुपये जाहिरात कर लावण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विक्रम येरणे या उमेदवारालाही आठशे रुपयांच्या बॅनरसाठी बाराशे रुपयांचा कर द्यावा लागणर आहे. नगरपरिषदेचा हा जाहिरात कर उमेदवारांना परवडणारा नाही, त्यामुळे याबाबत अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा... 500 ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवदान; डॉक्टरांच्या कामगिरीला सलाम

नगरपरिषदेने जाहिरात कराबाबत घेतलेला ठराव, हा सर्वसामान्य उमेदवारांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. या निर्णयाने अनेक गरीब उमेदवार निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय मुख्याधिकारी यांनी या ठरावाची अंमलबजावणी न करता नियमानुसार जाहिरात कराची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विक्रम येरणे या उमेदवाराने केली आहे. तसेच यासाठी त्यांनी इतर नगरपरिषदांचा आदर्श घ्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

हेही वाचा... जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!

नगरपरिषदेच्या सभासदांच्या सभेमध्ये शहरात दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस लावण्यात येणाऱ्या बॅनरवर प्रति स्क्वेअर फूट १५ रुपये दराने जाहिरात कर आकारण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही फक्त त्या ठरावाची अंमलबजावणी करत आहोत, असे निवडणूक निर्णय मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details