महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chanhdrapur Fueling At Public Place : चंद्रपुरात सार्वजनिक ठिकाणी थेट टँकरने होत आहे इंधनपुरवठा, प्रशासनाचे दुर्लक्ष - चंद्रपूर इंधन भरणे बातमी

सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आणणारा एक प्रकार समोर आला आहे. डीझल वाहून नेणाऱ्या टँकरने ( Fuel Fill In Tanker At Public Place ) सार्वजनिक ठिकाणी थेट दुसऱ्या वाहनात इंधन भरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये उघडकीस आला आहे.

Chanhdrapur Fueling At Public Place
Chanhdrapur Fueling At Public Place

By

Published : Jun 3, 2022, 5:45 PM IST

Updated : Jun 3, 2022, 6:22 PM IST

चंद्रपूर -सध्या चंद्रपुरात उन्हाचा पारा शिगेला पोचला आहे. मागच्या 118 वर्षांचा विक्रम या वर्षी मोडीत निघाला आहे. यावर्षी आगीच्या दोन मोठ्या दुर्घटना घडल्या, ज्यात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. असे असताना सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आणणारा एक प्रकार समोर आला आहे. डीझल वाहून नेणाऱ्या टँकरने ( Fuel Fill In Tanker At Public Place ) सार्वजनिक ठिकाणी थेट दुसऱ्या वाहनात इंधन भरण्यात येत असल्याचा धक्कादायक असा हा प्रकार आहे. शहरातील प्रतिष्ठित डीएनआर ट्रॅव्हल्सकडून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेल भरता येत नाही, पेट्रोलपंपावरदेखील खुले इंधन मिळत नाही, असे असताना सर्व नियम धाब्यावर बसवून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

रस्त्यावर भरले जाते पेट्रोल -डीएनआर ट्रॅव्हल्सचे कार्यालय चंद्रपूर-नागपूर महामार्गावर आहे. इथूनच नागपूर, औरंगाबाद, पुणे येथे ट्रॅव्हल्स जातात. थेट महामार्गावरच ट्रॅव्हल्स उभ्या असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. सोबत येथे वाहनांची आणि प्रवाशांची वर्दळ असते. याच ठिकाणी थोडा आडोसा घेऊन उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये एका दुसऱ्या टँकरने पाईप लाऊन डिझेल भरले जात आहे. दिवसरात्र हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. हे डिझेल भरताना कुठलीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे एखादी चूक झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सर्रास सुरू असतानाही प्रशासनाने अद्याप यावर कारवाई केली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुल मार्गावर डिझेल टँकर आणि एका ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याच्या काही दिवसांनी बल्लारपूर पेपरमिलच्या लाकूड डेपोला आग लागली. केवळ एका ठिणगीने तब्बल 52 हजार टन लाकडांचा कोळसा झाला. 100 कोटींवर अधिक नुकसान यात झाले. या पार्श्वभूमीवर डीएनआर ट्रॅव्हल्सकडून होत असलेला प्रकार हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.

डीएनआर संचालकाची टाळाटाळ -याबाबत डीएनआर ट्रॅव्हल्सचे संचालक राणा पाल सिंह यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आमच्याकडे सर्व परवानगी असल्याचे सांगितले. मात्र, रस्त्यावर डिझेल भरण्याची परवानगी याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

त्या वाहनाचे गूढ अद्याप कायम -एमएच34 बीजी 5977 हे वाहन डिझेल टँकर म्हणून वापरले जाते. मात्र, असे वाहन वापरण्यासाठी high explosive विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्वलनशील पदार्थ याची वाहतूक करण्यासाठी त्याचा आराखडा बनवावा लागतो. यानंतर त्याच्या साठवणूक क्षमतेची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर परिवहन विभागाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. यानंतर वजनमापे विभागातून त्याची साठवणूक क्षमता तपासून दिली जाते. मात्र, तशी प्रक्रिया या वाहनाची केली गेली नाही. त्यामुळे या डिझेल टँकर वाहनाचे गूढ अद्यापही कायम आहे. जर कुठलीही परवानगी घेतली गेली नाही, तर हे वाहन राजरोसपणे धावत कसे आहे हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा-पुण्यात धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकाने उकळते पाणी टाकून तीन भिकाऱ्यांचा केला निर्दयी खून

Last Updated : Jun 3, 2022, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details