राजुरा (चंद्रपूर) - शौक भागविण्यासाठी माणसे कुठलाही स्तर गाठू शकतात, याचा प्रत्यय येणारी घटना गोंडपिपरी तालुक्यात घडली आहे. एका औषध दुकानातून चोरट्यांनी 'फ्रेश वॉश', 'बॉडी स्प्रे'वर डल्ला मारला. काऊंटरमधील एक हजार रुपयाची रक्कमही लंपास केली. दुकान मालकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात आज (रविवार) उघडकीस आली.
औषध दुकानातील 'फ्रेश वॉश', 'बॉडी स्प्रे'वर चोरट्यांचा डल्ला - फ्रेश वॉश बॉडी स्प्रे चोरीला
दुकानातील सामानाची चौकशी केली तेव्हा 'फ्रेश वॉश', 'बॉडी स्प्रे' चोरल्याचे लक्षात आले. गल्ल्यातील हजार रुपयांची रक्कमही गायब होती. दिनगलवर यांनी लगेच धाबा उप पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार केली. विशेष म्हणजे हे औषध दुकान पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ आहे.
हेही वाचा -भ्रष्टाचारविरोधी लोकपाल कायद्याद्वारे २०१९-२०२० वर्षात एकूण १,४२७ तक्रारी
धाबा येथील बसस्थानक परिसरात पुष्पाई औषध दुकान आहे. या दुकानाचे मालक मधुसूदन दिनगलवार हे गोंडपिपरी येथून धाब्याला ये-जा करतात. आज दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना एका बाजूने शटर उघडलेल्या स्थितीत दिसले. दुकानातील सामानाची चौकशी केली तेव्हा फ्रेश वॉस, बॉडी स्प्रे चोरल्याचे लक्षात आले. गल्ल्यातील हजार रुपयांची रक्कमही गायब होती. दिनगलवर यांनी लगेच धाबा उप पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार केली. विशेष म्हणजे हे औषध दुकान पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ आहे. चोरांचा शोध धाबा पोलीस घेत आहेत.