महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच वर्षीय बालिकेवर चौदा वर्षीय मुलाचा अत्याचार - Chandrapur Police News

चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना तालुक्यातील एका गावात आरोपीने पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केले. ही घटना समजताच गावकऱ्यांनी परिसरातील बाजारपेठ बंद ठेऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

पाच वर्षिय बालिकेवर चौदा वर्षिय मुलाचा अत्याचार

By

Published : Nov 5, 2019, 3:29 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यातील कोपरना तालुक्यात पाच वर्षीय बालिकेवर चौदा वर्षीय मुलाने अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. परिसरात खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेवर चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात घडली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला कठोर शिक्षा द्या, या मागणीलासाठी बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा तालुक्यातील आरोपीने रस्त्यालगत खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेला बळजबरीने घरात कोंबले. दरवाज बंद करून त्या चिमुकल्या बालिकेवर आरोपीने अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी जवळच असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठले. या घटनेची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच गावकरी संतापले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी परिसरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जावू नये या करता अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details