चंद्रपूर- जिल्ह्यात आणखी 9 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालात एकूण 9 रुग्ण हे कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 12 एवढी झाली आहे.
प्रशासनाची डोकेदुखी वाढली; चंद्रपुरात आणखी 9 पॉझिटिव्ह रुग्णाची भर, एकूण संख्या 12 वर - चंद्रपूर कॅन्टोनमेंट क्षेत्र
चंद्रपुरात बुधवारी रात्री आलेल्या अहवालात एकूण 9 रुग्ण हे कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दुर्गापूर ग्राम पंचायतीच्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने हा परिसर सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संग्रहित छायाचित्र
दुर्गापूर ग्रामपंचायत येथील एक 55 वर्षीय व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आला होता. हा परिसर सील करून त्याला कॅन्टोनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. याच दरम्यान रात्री आणखी 9 रुग्णांची भर पडली आहे. हे व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षातील असल्याची माहिती आहे. या वृत्ताला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गेहलोत यांनी दुजोरा दिला आहे.